महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत वजिरखेडे

Gram Panchayat Vajirkhede

गावाची माहिती

वजिरखेडे हे गाव मालोगाव तालुक्यापासून ३ कि.मी. उतरलेले मोसम नदीकिनारी वसलेले आहे. गावाचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. वजिरखेडे गावाला सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय आहे. सन १९६६ मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना झालेली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाची एकूण लोकसंख्या ३४४९ आहे. गावात प्राचीन असे स्वयंभू कलेश्वर महादेव मंदिर, श्रीराम मंदिर, संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, ग्रामदैवत म्हाळोबा महाराज मंदिर, दत्त मंदिर अशी प्राचीन मंदिरे आहेत. गावाला लागून असलेल्या मोसम नदीवर वज्र नावाचा डोह आहे. यावरून गावाला वजिरखेडे असे नाव पडले अशी मान्यता आहे. त्या अपभ्रंश होऊन वजिरखेडे असे नाव आज प्रचलित आहे. गावातील तरुण मोठ्या प्रमाणात सैन्यात तसेच शासकीय सेवेत सर्व उच्च पदांवर कार्यरत आहेत. याचा गावाला अभिमान आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात देखील गाव अग्रसर आहे.

लोकसंख्या माहिती (Vajirkhede Data)

Particulars Total Male Female
Total No. of Houses 705 - -
Population 3,441 1,777 1,664
Child (0–6) 444 241 203
Schedule Caste 165 84 81
Schedule Tribe 614 307 307
Literacy 83.32 % 89.58 % 76.73 %
Total Workers 1,797 1,030 767
Main Worker 1,784 - -
Marginal Worker 13 9 4

पाणीपुरवठा स्रोत – नळ पाणीपुरवठा योजना

  • सार्वजनिक विहिरी –
  • विंधन विहिरी – १०
  • हातपंप –
  • पक्के बंधारे –
  • गाव पाझर तलाव – ०१

शैक्षणिक व सामाजिक माहिती

गावात पहिली ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा असून मॉडेल स्कूल म्हणून मालेगाव तालुक्यात अप्रतिष्ठा शाळा आहे. तसेच पहिली ते ८ वी पर्यंत एक वस्ती शाळा देखील आहे व ५ वी ते १० वी पर्यंत माध्यमिक शाळा आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा तसेच राज्य पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत.

दळणवळण सुविधा

वजिरखेडे े े गाव मालेगाव पासून मुख्य रस्त्याला जोडलेले आहे. गावात दररोज बससेवा आहे. विद्यार्थ्यांना स्वतंत्र बससेवा उपलब्ध आहे. गावातून मालेगाव जाण्यासाठी खाजगी वाहने देखील उपलब्ध आहेत.

धार्मिक स्थळे

गावात प्राचीन स्वयंभू कुलेश्वर महादेवाचे भव्य मंदिर आहे. ग्राम देवता म्हाळोबा महाराज मंदिर, श्रीराम मंदिर, संत सावता महाराज मंदिर, संत ज्ञानेश्वर माडली मंदिर, श्री दत्त मंदिर, समशुंगी माता मंदिर, श्री गोरेश्वरनाथ मंदिर, मंगिर बाबा मंदिर अशी धार्मिक स्थळे आहेत. वर्षभरात गावात ४ हरीनाम सप्ताह होतात, त्यामुळे वर्षभर गावात धार्मिक वातावरण असते.

गावातील पशुधन

गावात मोठ्या प्रमाणात शेतीसोबत जोपासून दूध व्यवसाय केला जातो. यात गायी आणि म्हशी यांच्यामधून मोठ्या प्रमाणात दूधाचे उत्पादन घेतले जाते. गावात दूध संकलन केंद्र देखील उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे गावात पोल्ट्री उद्योगाचे देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी उत्पादन घेत आहेत.

शाळेची माहिती

नाव: श्री भिका श्रावण मंडळ

पद: मुख्याध्यापक जनता विद्यालय वजीरखेडे

संपर्क क्रमांक: 9511292163

शिक्षक संख्या: 16

विद्यार्थी संख्या: 510

गावातील सुविधा वजिरखेडे

सुविधेचे नाव संख्या
ग्रामपंचायत कार्यालय
पाझर तलाव
सोसायटी
रास्त भाव दुकान
पोस्ट ऑफिस
तलाठी ऑफीस
CSC सेंटर

जि.प.शाळा वजिरखेडे

मुख्याध्यापक सौ. वैशाली सुनील सोनवणे
मोबाईल क्रमांक ७८४३०८११४६
शिक्षक संख्या
वर्ग १ ते ४
विद्यार्थी संख्या ११९

जि.प.शाळा उंबरेश्वर वस्ती

मुख्याध्यापक श्री संजय कौतिक बोरसे
मोबाईल क्रमांक ८८०५९५३४५८
शिक्षक संख्या
वर्ग १ ते ४
विद्यार्थी संख्या ३०

जनता विद्यालय वजिरखेडे (माध्यमिक शाळा)

मुख्याध्यापक श्री. भिका श्रावण मंडळ
मोबाईल क्रमांक ९५११२९२१६३
शिक्षक संख्या १६
वर्ग ५ ते १०
विद्यार्थी संख्या ५१०